logo

Search Here

धावत्या एक्स्प्रेेसचे छत कापून दरोडेखोरांनी रिझर्व्ह बँकेचे 5.78 कोटी रुपये पळवले

नवी दिल्ली- रिझर्व्ह बँकेचे ३४२ कोटी रुपये घेऊन सालेमहून चेन्नईला जाणाऱ्या रेल्वेत अगोदरपासून दडून बसलेल्या दरोडेखोरांनी चक्क डब्याचे छत कापून ५.७८ कोटी रुपये पळवले. ३० जून २०१६ पूर्वी रिझर्व्ह बँकेने सन २००५ पूर्वीच्या नोटा परत घेतल्या होत्या. त्याच नोटांचा हा साठा होता.

२२८ बॉक्समधून या जुन्या नोटा पाठवल्या जात होत्या. सकाळी ११ च्या सुमारास एक कामगार रेल्वेच्या बोगीत गेला तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. दरोडेखोरांनी सुमारे चौरस फूट आकारात हा डबा कापला. यातून २-३ बॉक्स बाहेर फेकले. याबाबत रिझर्व्ह बँकेने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.

रेल्वे कर्मचाऱ्यांवर संशय :
विशेष म्हणजे दरोडेखोर रेल्वेचा डबा फोडत असताना रेल्वेतील एकाही संबंधित कर्मचारी किंवा सुरक्षा यंत्रणेतील लोकांना मागमूस लागला नाही. यामुळे या दरोड्यात रेल्वे कर्मचाऱ्यांचाच हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

Source:-bhaskar.com

Image Source bhaskar.com

WhatsApp sharing is currently supported by iOS and Android. This button will figure out the current platform by itself and only shows up on supported devices!